पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद
(गुरूवार, दि. १५ जुलै २०२१ ते रविवार, १८ जुलै २०२१)

पार्श्वभूमी
भारतीय शिक्षणक्षेत्रावर इंग्रजी शिक्षणाचा असलेला प्रभाव हा भारताच्या हजारो वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या शिक्षणाचे अवमूल्यन करतो.
न हि ज्ञानेन सदृशं। पवित्रम् इहविद्यते॥
असा सिद्धांत सांगणाऱ्या या भारतासारख्या ज्ञानभूमीमध्ये आज उदरनिवार्हासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाला अतिमहत्त्व दिले गेले. त्यामुळे, जीवन जगण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि तंत्रज्ञान उपलब्ध होऊनही जीवन का जगावे ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. त्याचा परिणाम मानसिक सुदृढता आणि आचरणातील शुचिता ही अलिकडच्या उच्चशिक्षणाच्या माध्यमातून मांडली जात नाही. पाप आणि पुण्य या मानवी जीवनाला शुद्ध करणाऱ्या प्रमुख संकल्पना बोथट होत गेल्या नि आज व्यक्तिगत आचरणातला भ्रष्टाचार हा अत्यंत सहजतेने मान्य करून, उच्चशिक्षित नागरिक जगताना आढळतात.
समिती

विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड
संस्थापक आणि अध्यक्ष
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

डॉ. विजय भटकर
संस्थापक आणि
पद्मविभूषण, कुलपती, नालंदा विद्यापीठ

डॉ. आर ए माशेलकर
पद्मविभूषण, प्रख्यात वैज्ञानिक

राहुल वि कराड
व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे
अध्यक्ष, संयोजन समिती व संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज, श्रीक्षेत्र देहू

ह.भ.प. श्री. रविदास महाराज शिरसाठ
कार्यकारी अध्यक्ष, संयोजन समिती

डॉ. संजय गो. उपाध्ये
समन्वयक, संयोजन समिती
सत्रांचे विषय
- आमचे संत तत्वज्ञ नव्हते का ?
- संतसाहित्य – समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र
- वारकरी संप्रदाय विचार : आधुनिक की कालबाह्य
- भारतीय संतविचाराचे खच्चीकरण इंग्रजी शिक्षणपद्धतीने केले काय?
- संत आणि आरोग्य व्यवस्थापन
- आमच्या तत्त्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले?
- भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?
वृत्तपत्रिका
गुरूवार, १५ जुलै २०२१
ते रविवार, १८ जुलै २०२१
संपर्क
मो. ९८५००७४२०३
मो. ९८२२५४७७२७
ईमेल
santsahityashikshan@mitwpu.edu.in